आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना एका वर्षात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.
योजनेचे लाभ
- दुय्यम आणि तृतीयक स्तरावरील रुग्णालयात मोफत उपचार
- 1500 हून अधिक आजारांवर उपचार समाविष्ट
- सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार
- प्रवेशपूर्व 3 दिवस व प्रवेशानंतर 15 दिवसांचा खर्च
पात्रता
SECC 2011 डेटाबेसनुसार ग्रामीण व शहरी गरीब कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत. महाराष्ट्रात महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेशी एकत्रित केली आहे.
आयुष्मान कार्ड कसे बनवावे
जवळच्या CSC केंद्र, सरकारी रुग्णालय किंवा आयुष्मान भारत पोर्टलवर जाऊन कार्ड बनवता येते. आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत न्यावे.
पात्रता तपासण्यासाठी PMJAY अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा 14555 या टोल फ्री नंबरवर संपर्क करा.